डॉ चव्हाण यांची खामगाव शहर पो.स्टे.ला तक्रार
खामगाव : स्थानिक नांदुरा रोडवरील चव्हाण हॉस्पीटलच्या संचालिका डॉ .शितल भावेश चव्हाण यांनी २३ डिसेंबर २१ रोजी शहर पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दिली .त्यामध्ये अशा आशयाचे नमूद केले आहे की आदमी फार्मा या मेडिकल स्टोअर्स वरून शिवकुमार यांचा कॉल २२ डिसेंबर रोजी फिर्यादीला कॉल आला होता . त्यांनी दिलेल्या माहितीवरून कोणी अज्ञात इसम फिर्यादीच्या लेटर पॅडचा वापर करून ‘ टरमिन ‘ नावाच्या इंजेक्शन घेत आहे.फिर्यादीचा कुठलाही वैद्यकीय सल्ला न घेता परस्पर इंजेक्शनचा वापर करीत आहे .’टरमिन ‘ नावाचे इंजेक्शन बीपी वाढविणे किंवा कमी करण्याकरीता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरण्यात येते तसेच मसल ग्रो व इतर कारणासाठीही अनधिकृतपणे वापरण्यात येते .
इंजेक्शनच्या अतिरिक्त वापरामुळे जीव घेणे ठरू शकते .मी व माझा स्टॉप कधीही अशा प्रकारच्या इंजेक्शनचे प्रिस्क्रीप्शन देत नाही . त्यामुळे फिर्यादीच्या नावाचे बनावट लेटर पॅडचा वापर करून टरमिन इंजेक्शन घेणाऱ्या अज्ञात इसमा डॉक्टर शितल भावेश चव्हाण यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे अज्ञात इसमाने विरुद्ध विरुद्ध त्वरीत कार्यवाही करण्यात असेही तक्रारीत नमूद केले आहे .तक्रारी सोबत अज्ञात इसमाने वापरलेले प्रिस्क्रीप्शन पेपर व आदमी फार्मा मेडिकलवरून इंजेक्शन खरेदी करताना अज्ञात इसमाचे सीसीटीव्ही फुटेज तक्रारी सोबत जोडले आहे . तक्रारीच्या प्रती संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत.खामगाव शहर पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे