April 19, 2025
जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ शेतकरी

डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांना यश ; जिल्ह्यातील महत्वाच्या प्रकल्पासाठी निधी मंजुर

बुलढाणा : जिल्ह्यातील अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जिगाव प्रकल्प साठी विशेष तरतूद म्हणून ४९०७ कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी आग्रही मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील व डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची राजभवन, मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. 
   जिगाव प्रकल्प हा जिल्ह्यातील अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असून निधीच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून प्रकल्पाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सतत पाठपुरावठा करत त्यांच्या विशेष प्रयत्नातून ६ ऑगष्ट रोजी मंत्रालय येथे जलसंपदा मंत्री यांच्या दालनात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती. त्यावेळी जिगाव प्रकल्पाच्या उर्वरित किंमतीमध्ये मुख्यतः भूसंपादन व पुनर्वसनाची किंमत असून त्यासाठी सुमारे चार हजार नऊशे सात कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. याकरिता राज्यपाल महोदयांच्या निधी वाटपाच्या सूत्रांमध्ये बदल करून जिगाव प्रकल्पासाठी विशेष तरतूद म्हणून येत्या तीन वर्षात चार हजार नऊशे सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी राज्यपाल महोदयांना भेटून त्यांना निवेदन देण्याचे ठरले होते. त्यानुसार आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी प्रत्यक्ष राजभवन येथे जाऊन राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घेऊन जिगाव प्रकल्पाला विशेष बाब म्हणून ४९०७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी केली आहे. यावेळी त्यांच्याबरोबर मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेश एकडे, बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related posts

राज्यात कोरोनाचा चौथा बळी!

nirbhid swarajya

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू केली ‘रेडिओ वाहिनी’

nirbhid swarajya

जलंब पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा महापूर…

nirbhid swarajya
error: Content is protected !!