खामगांव : येथील डॉ. आशिष अग्रवाल यांच्या हॉस्पिटल मधे काम करणाऱ्या विठ्ठल महाले याला खुद्द डॉ.आशिष अग्रवाल यांनी काही गावगुंड बोलाऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खामगांव येथील जलंब नाक्यावर डॉ.आशिष अग्रवाल यांनी गावगुंड बोलाऊन मारहाण केल्याची तक्रार विठ्ठल महाले याने पोलीस स्टेशन मधे दिली आहे.फिर्यादिने दिलेल्या तक्रारी मधे असे सांगितले आहे की, डॉ.आशिष अग्रवाल यांनी दी 12 ऑगस्ट रोजी मला फोन करुन आपल्या हॉस्पिटल मध्ये बोलावले होते. तेव्हा मी खामगाव मध्ये कामानिमित्त हजर असल्यामुळे मी लगेच दवाखान्यात गेलो. मी गेल्यावर त्यांना विचारणा केली असता की मला का बोलावले ? तर त्यांनी मला चढ्या आवाजात धमक्या देऊन मला म्हणाले की तू माझ्या हॉस्पिटलमध्ये काम का करत नाही असे म्हणून मला त्यांनी शिवीगाळ केली, व त्यांच्यासोबत असलेले दोन अनोळखी इसमांनी मला लाथाबुक्क्यांनी पाठीवर तोंडावर हातावर मारहाण केली. यापुढे माझ्या हॉस्पिटलमध्ये दिसलास तर जीव आणि मारून टाकेल व खोट्या विनयभंगाच्या केसमध्ये तुला अडकवून टाकेल अशी धमकी दिली. त्यांच्या या धमकीमुळे व मारहाणीमुळे मी व माझे कुटुंबीय अत्यंत घाबरलो असून मला डॉ. आशिष अग्रवाल यांच्यापासून जीवाचा धोका निर्माण झाला आहे.मला जर काही झाले याला सर्वस्वी जबाबदार डॉ.आशिष अग्रवाल हेच राहतील असे विठ्ठल महाले याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.विठ्ठल महाले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ.आशिष अग्रवाल व अन्य दोघांविरुद्ध कलम 323,504,506 नुसार अदाखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.