खामगाव : नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे विनोद सुपरशॉपचे संचालक विनोद डिडवाणीया यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत कोरोना विरुद्ध लढा देण्याकरिता १ लाखाची भरीव मदत दिली आहे.संपूर्ण देश आज कोरोनाच्या संकटात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मदतीचे आवाहन केले आहे.याला प्रतिसाद देत विनोद डिडवाणीया यांनी खामगाव शहरातून वैयक्तीरीत्या सर्वात आधी १ लाखाची मदत दिली आहे.त्यांनी मदतीची राशी पंतप्रधान राहत कोषात जमा केली आहे.त्यांचे हे कार्य खरोखर अभिनंदनीय असून या प्रमाणेच समाजातील दानदात्यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.याच प्रमाणे खामगाव मध्ये कितीतरी लोक स्वतःहाला कोरोना वायरस पासून वाचवण्यासाठी सोशल डिस्टंसिंग व होम कोरंटाईन करून घेत असून अश्याच वेळी माणुसकीच्या भावनेने विनोद सुपरशॉपचे संचालक विनोद डिडवाणीया व मित्र परिवारातर्फे स्थानिक घाटपुरी नाका येथे आपल्या गावातील उपाशीपोटी एकही व्यक्ती झोपला नाही पाहिजे यासाठी सकाळ व संध्याकाळ जेवणाची व्यवस्था सुद्धा यांनी केली आहे.
previous post