खामगाव:भारतीय डाक विभागाकडून ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांना आधार लिंक करून देण्यात येत आहे.५० रू शुल्क घेऊन मोबाईल नंबर आधार शी लिंक करण्यात येत आहे. ही मोहीम १५ मार्च ते ३१ मार्च चालू आहे.आधारला मोबाईल नंबर जोडणे व बदलणे करून देण्यात येत आहे. आधार क्रमांक ला मोबाईल नंबर लिंक असण्याची फायदे सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ई – श्रम कार्ड काढण्यासाठी विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी पॅनकार्ड , ड्रायव्हींग लायसन्स , पासपोर्ट ई .काढण्यासाठी बँक तसेच डिमॅट खाती काढण्यासाठी स्वत : च्या आधार मध्ये किरकोळ बदल करण्यासाठी पी.एम. किसान योजनेच्या संकेत स्थळावर E – KYC अद्यायावत करण्यासाठी वन नेशन वन रेशन कार्ड या योजने साठी आवश्यक आहे. ही मोहीम खामगाव तालुक्यात राबवण्यात येत आहे. यामध्ये बोरी आडगाव येथील पोस्ट मास्टर छगन बोहरपी हे परिसरातील गावांमध्ये जाऊन नागरिकांचे मोबाईल नंबर आधारशी संलग्न करत आहेत.ग्रामीण डाक विभागाकडून राबवत असलेल्या योजनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.आधार संलग्न करणे रहलेल्या नागरिकांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपला मोबाईल नंबर जोडावा असे आवाहन करण्यात येत आहे. तालुक्यात आधार सेंटर कमी प्रमाणात आहेत त्यामुळे नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते त्यामुळे जास्तीचा भुर्दंड सोसावा लागतो त्यामुळे शासनाच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे
previous post