संपूर्ण महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांसोबत उभा आहे
खामगांव : ज्या प्रमाणे उद्धव ठाकरे व शरद पवारांनी राज्यात माफियागिरी दादागिरी करीत एसटी कर्माच्याऱ्यावर दाखविली आहे त्याची महाराष्ट्रातील जनतेला लाज वाटतंय. राज्यातील ३ डझन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे, पगार देत नाहीत हे लोक वसुलीचा पैसा गोळा करून मोजण्यात मग्न आहेत. उद्धव ठाकरे व शरद पवारांना चेतावणी द्यायची आहे की, संपूर्ण महाराष्ट्र हा एसटी कर्मचाऱ्यांसोबत उभा आहे. तुम्ही २ हजार कर्मचाऱ्यांना सस्पेंड केले आहे हे लक्षात ठेवा. उद्धव ठाकरे व शरद पवार एक दिवस महाराष्ट्र हा तुम्हाला सस्पेंड करणार आहे अशी खरमरीत टीका भाजपाचे किरीट सोमय्या यांनी शेगाव येथे केली आहे. किरीट सोमय्या हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर ते एसटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनावर बोलत होते.