खामगाव : गणेशोत्सव व गौरी पुजनानिमित्त घराघरात सध्या भक्तीमय वातावरण दिसत आहे. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्या कारणाने माेठ्या धामधुमीत साजरे होणारे गौरी पुजनाचे कार्यक्रम यावर्षी साध्या पध्दतीने साजरे होतांना दिसत आहेत. परंतु दरवर्षी प्रमाणे यंदा गणेशोत्सव व गौरी पुजनातून सामाजिक संदेश देणारे देखावे अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहेत. असाच सामाजिक संदेश येथील अनिकट रोड भागातील रहिवासी प्रवीण ठाकरे यांच्या कुटूंबियांनी दिला आहे.कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी,परिचारीका यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.त्यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत ठाकरे कुटूंबियांनी त्यांच्या घरी विराजमान केलेल्या ज्येष्ठ गौरींना डॉक्टरांची वेशभूषा व मास्क लावले आहे. ठाकरे कुटुंबाकडे दरवर्षी ज्येष्ठ गौरींचे पुजन होत असते. परंतु यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे कोरोनाच्या या काळात सामाजिक बांधिलकी जोपासत आपणही काही वेगळे करुन कोरोना महामारीबद्दल जनजागृतीपर संदेश द्यावा ही संकल्पना प्रविण ठाकरे यांच्या डोक्यात आली व शेवटी कुटूंबियांशी चर्चा करुन त्यांनी सर्वांना ज्या डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेतली. त्या सर्व कोरोना योद्धाचा सत्कार केला.यावेळी रमेश ठाकरे यांच्याकडून ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार शेख रफिख, सामान्य रुग्णालयात जनरल फिजिशियन डॉ. पवार, परिचारिका सौ. राऊत मॅडम, सफाई कर्मचारी सारसर, व लोकोपचार चे पत्रकार शिवाजी भोसले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश ठाकरे,सचिन ठाकरे,पंकज वाकुडकर,गणेश ठाकरे,पवन ठाकुर,अंकित गावंडे,सागर लव्हाळे,शोभा ठाकरे, प्रांजलि ठाकरे, शीतल ठाकरे, पिंटू वतपाळ यांच्यासह ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.