माहिती कार्यालयात नोंदणीकृत पत्रकारांना लॉकडाऊन मध्ये वृत्तसंकलनाची मुभा द्यावी
लॉकडाऊन मध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच वृत्तसंकलन करण्याची होती परवानगी
बुलडाणा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला असून या लॉकडाऊन दरम्यान वृत्तसंकलन करण्यासाठी फक्त अधिस्वीकृत पत्रकारांनाच मुभा देण्यात आली आहे, मात्र राज्यात अश्या पत्रकारांची संख्या फार कमी असल्याने ज्या पत्रकारांकडे आपल्या वृत्तवाहिनीचे ओळखपत्र आहे किंवा ज्या पत्रकाराची जिल्हा माहिती कार्यालयात नोंदणी केली आहे अशा सर्व पत्रकारांना या लॉकडाऊन मध्ये वृत्त संकलनासाठी फिरण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी टीव्ही जर्नाललिस्ट संघटने कडून बुलडाणा जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे,यावेळी संघटनेचे पदाधिकारी वसीम शेख, युवराज वाघ, संजय जाधव ,चंद्रकांत बर्दे, संदीप वानखडे, संदीप शुक्ला, नितीन पाटील, आदी पत्रकार उपस्थित होते.