November 20, 2025
बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

टीव्ही अभिनेता समीर शर्माची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई : मनोरंजन सृष्टीला आज आणखी एक धक्का बसला आहे. टीव्ही अभिनेता व मॉडेल समीर शर्मा याने मुंबईतील मालाड इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ४४ वर्षीय समीर मुंबईतील मालाड पश्चिमस्थित अहिंसा मार्गावरील नेहा सीएचएस या इमारतीमध्ये वास्तव्याला होता. त्याचा मृतदेह घरातील किचनच्या छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
समीरच्या घरातून कोणतीच सुसाइड नोट मिळालेली नाही.मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाइट ड्युटीवर असलेल्या इमारतीच्या वॉचमनने आधी समीरचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने पोलिसांना व सोसायटीच्या सदस्यांना याविषयीची माहिती दिली.
समीरने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.समीरने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या इमारतीत फ्लॅट भाड्याने घेतला होता.
त्याची ‘आकस्मित मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे’, अशी माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जॉर्ज फर्नांडिस यांनी दिली. समीरने छोट्या पडद्यावर ‘कहानी घर घर की’, ‘क्योंकी की सास भी कभी बहू थी’, ‘ये रिश्ते हैं प्यार के’, ‘ज्योती’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनय केला होता.

Related posts

Barely Into Beta, Sansar Is Already Making Social VR Look Good

admin

राष्ट्रवादी काँग्रेसची पार्टीच्या वतीने स्वाभिमान सप्ताह निमित्त नियोजन बैठक संपन्न

nirbhid swarajya

अंधश्रध्दा रूढी, परंपरांना मूठमाती देत समाजापुढे निर्माण केला नवा आदर्श

nirbhid swarajya
error: Content is protected !!