खामगाव:दिनांक १५ऑगस्ट २०२२ म्हणजेच भारत देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस.शासनाने सुरू केलेल्या हर घर तिरंगा या संकल्पनेला संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळाला. त्याचप्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहरात सुद्धा नागरिकांनी स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला.तसेच टीम एक वादळ भारताचं या चळवळीच्या वतीने गेल्या ६ वर्षापासून राष्ट्रगीताबद्दल संपूर्ण देशात जनजागृती ची मोहीम रबिण्यात येत असते.या चळवळीचा एकच उद्देश आहे की देशातील सर्व सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक व राजकीय ठिकाणी सामूहिक झेंडावंदन व राष्ट्रगीत साजरं व्हावं,आणि प्रत्येक भारतीयाला झेंडावंदन व राष्ट्रगीत गाण्यासाठी संधी मिळावी,तसेच आपल्या देशातील नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी,आपला देश सुरक्षित ठेवण्यासाठी जे सैनिक स्वतःच्या जीवाची,परिवाराची पर्वा न करता देश सुरक्षित रहावा यासाठी स्वतःचा जीव धोक्यात ठेऊन सीमेवर आपली देशसेवा बजावत आहेत.अशा सैनिकांना सलामी देण्यासाठी,त्यांचा सन्मान करावा याकरता लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सुरू केलेली ही एक चळवळ आहे.देशाच्या या ७५ व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त खामगांव तालुक्यातील सुटाळा या गावातील एक देशाप्रती देशसेवा देण्यासाठी सीमेवर जाऊन आपलं रक्षण करणारी ध्येयवेडी तरुणी आरती ताई जाधव ही सशस्त्र सीमा बलामध्ये कार्यरत आहे.तर अशा या एक महिला जवानाचा सन्मान करून याठिकाणी गौरव करण्यात आला.त्याच प्रकारे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले खामगांव विभागाचे लोकमत वृत्तपत्राचे उपसंपादक मा.अनिल दादा गवई,निर्भिड स्वराज्य व स्वराज्य फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.अमोल दादा गावंडे यांचा सुद्धा सन्मान व्हावा म्हणून टीम एक वादळ भारताचं या चळवळीचे बुलढाणा जिल्हा समन्वयक डॉ.नकुल उगले पाटील,राजू मिरगे, अमित पांडे,जयराज छांगाणी, व शीतल अकॅडमी, खामगांव चे संचालक श्री मुकेश पाटील,योगेश पाटील यांच्या वतीने या प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.आजच्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून खामगांव तालुक्याचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी मा.श्री अतुल पाटोळे सर, नायब तहसीलदार मा.श्री हेमंत पाटील सर व इतर अधिकारी यांची उपस्थिती लाभली.या कार्यक्रमाचे आयोजन टीम एक वादळ भारताचं व शीतल अकॅडमी, खामगांव यांच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आश्र्विनी फाळके,शीतल वाघ,अंजू मॅडम व सर्व विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नकुल उगले पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन हे मा.योगेश पाटील यांनी केले…महिला ह्या कुठल्याच क्षेत्रात मागे नाही आहेत.मग मुली सैन्यात का भरती होत नाही असा प्रश्न मला नेहमी पडतो.मुलींनी डिफेन्स मध्ये यावे आज मी सर्व मुलींना आव्हान करते आहे. – आरती जाधव – सशस्त्र सीमा बल.