रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन
बुलडाणा : पत्रकार दिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्हा टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने येत्या 8 जानेवारीला बुलडाणा येथील पत्रकार भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला इच्छुक रक्तदात्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन असोशिएनकडून करण्यात आले आहे. कोरोना आजारामुळे राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बुलडण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी नागरिकांना केले आहे. याच पार्श्वभूमीवर टिव्ही जर्नालिस्ट असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या सुचनेनुसार रक्तदान शिबिर घेण्याकरीता येथिल विश्राम भवन येथे बैठकीचे आयोजन आज दिनांक 6 जानेवारीला करण्यात आले होते.यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून येत्या 8 जानेवारी रोजी बुलडाणा येथील पत्रकार भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यासंदर्भात ठरविण्यात आले.या रक्तदान शिबिरचे उद्घाटन बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते होणार आहे.तरी या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनकडून करण्यात आले आहे.या बैठकीत टिव्ही जर्नालिस्ट असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष वसीम शेख,सचिव युवराज वाघ,उपाध्यक्ष संदिप वानखेडे,कोषाध्यक्ष दिपक मोरे,जिल्हा प्रवक्ता संदिप शुक्ला, संजय जाधव,जितेंद्र कायस्थ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नितीन कानडजे पाटील,तालुका समन्वयक निलेश राऊत,सुनिल मोरे हे उपस्थीत होते.