फ्रन्टलाइनमध्ये पत्रकारांनाही कोरोनाची लस द्या व कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम द्या.
बुलडाणा : कोरोना काळामध्ये कर्मचारी सोबत काम करणाऱ्या पत्रकारांनाही फ्रंट लाईट मध्ये समावेश करून त्यांनाही कोरोना लसी देण्यात यावी व कोरोना काळामध्ये कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना तात्काळ विम्याची पन्नास लक्ष रुपयांची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी टीव्ही जर्नालिस्ट असोशियनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी असोशियन चे अध्यक्ष वसीम शेख, सचिव युवराज वाघ, समन्वयक कासिम शेख,कोषाध्यक्ष दीपक मोरे, प्रवक्ता संदीप शुक्ला, गणेश सोळंकी,संजय जाधव, प्रसिद्धीप्रमुख नितीन कानडजे पाटील, बुलडाणा समन्वयक निलेश राऊत तालुका हे उपस्थित होते. तर जिल्हा पत्रकार संघाकडूनही पत्रकारांना कोरोना लस देण्या विषशी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे हे उपस्थीत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी 5 फेब्रुवारीला बुलडाण्याच्या लोणार येथे दौऱ्यावर आले होते. कोरोना काळामध्ये ज्याप्रमाणे आरोग्य कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, अधिकारी समाज सेवा करण्यासाठी कार्यरत होते,यांच्या खांद्याला खांदा लावून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार सुद्धा कोरोना काळात समाजामध्ये जनजागृतीचे काम करत होते, त्यांचा समावेश सुद्धा कोरोना लसीकरण करताना फ्रन्टलाइन कर्मचारी म्हणून करण्यात यावा व सर्व पत्रकार बांधवांना ही लस देण्यात यावी. सोबतच कोरोना काळामध्ये कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकार बांधवांच्या कुटुंबीयांना विमा निधीतून पन्नास लाख रुपये तात्काळ देण्यात यावी अशी मागणी टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे आज लोणार येथे करण्यात आली.