खामगांव: आज सकाळ च्या सुमारास नांदुरा रोडवरील राजनकर कॉम्प्लेक्स समोर टिप्पर च्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना सकाळी 10 च्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार मृतक कैलास आखरे वय 38 ऱ्या.हिवरा बु. हा आपला भाऊ रामेश्वर आखरे सोबत कॅनरा बँकेमधे कामनिमित्त आले होते. बँकेच्या बाहेर उभे असताना कैलास आखरे हे रोड क्रॉस करुन जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव टिप्पर क्र. MH-28-BB-1818 ने त्यांना जोरदार धड़क दिली, सदर धडक इतकी जोरदार होती कि या मधे कैलास आखरे याचा जागीच मृत्यु झाला. अपघात झाल्यावर चालक टिप्पर घेऊन फरार झाला होता. शहर पोलिसानी लगेच घटना स्थळी धाव घेऊन सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.पोलिसांनी आपली चक्र फिरूऊन अवघ्या 15 मि. मधे टिप्पर व चालक विजय भीकाजी वानखड़े रा शिरजगांव देशमुख ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन ला लावला आहे.भगतसिंग चौकात एका इमारतीच्या कामावरिल टिप्पर असल्याची माहिती एपिआय रविंद्र लांडे यांनी दिली आहे.