टाकळी हाट :- येथे विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या असून त्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे या समस्या दूर करण्यासाठी टाकळी हाट येथील ग्रामस्थांनी आज 16 सप्टेंबर रोजी शेगावचे तहसीलदार समाधान सोनवणे यांना निवेदन देऊन गावामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे या निवेदनात म्हटले आहे की टाकळी विरो व टाकळी हाट हे गट ग्रामपंचायत असून टाकळी हाट या गावाकडे सतत दुर्लक्ष होत आहे त्यामुळे टाकळी हाट येथे कोणत्याच प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे शुद्ध पिण्याच्या पाण्याअभावी गावातील 30 जणांना किडनी स्टोन सारख्या गंभीर आजाराची लागण झाली आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गाव मध्ये पक्के रस्त्या अभावी ग्रामस्थांच्या हाल होत आहेत तर सांडपाणी व्यवस्थापन नसल्याने गरीब ग्रामस्थांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरत आहे सांडपाण्याची टक्केच असल्याने मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होऊन त्यामुळे दुर्गंधी तसेच आरोग्याला मोठ्या प्रमाणात गंभीर धोका निर्माण झाला आहे या व इतर समस्या त्वरित सोडविण्याबाबत योग्य ती कारवाई करून टाकण्यात गावामध्ये सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून निवेदनावर राजेश फाळके अमोल फाळके संजय फाळके उमेश फाळके रामेश्वर फाळके यांच्यासह अनेक गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
previous post