April 19, 2025
खामगाव जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा शेगांव

ज्ञानगंगा प्रकल्प 100 टक्के भरला; 36 गावांना सतर्कतेचा इशारा

खामगांव : ज्ञानगंगा प्रकल्प पूर्ण भरला असून ओवरफ्लो झाला आहे. यामुळे आता बहुतांश गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. 36 गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. आज हा प्रकल्प 100 टक्के भरला आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरण पूर्ण भरून सांडवा प्रवाहित होऊ शकतो. त्यामुळे नदीला धरणाचे खाली पूर येण्याची शक्यता आहे.याकरिता पाटबंधारे विभागाने आज ज्ञानगंगा नदीकाठच्या तांदुळवाडी सिंचन शाखा अंतर्गत येणाऱ्या 36 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे व आपली गुरे-ढोरे सुरक्षित स्थळी हलवण्यात बाबत गावात दवंडी द्वारे सुचित सुद्धा करण्यात आले आहे. हे धरण पुर्ण भरल्यामुळे खामगाव-नांदूरा यासह परिसरातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. परंतु यावर्षी प्रकल्प पूर्ण भरल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटणार आहेत.

या गावांना दिला सतर्कतेचा इशारा :
गेरू माटरगाव, सारोळा, निमकवळा,पिंपळगाव राजा, दोडवाडा, वसाडी खु,धानोरा बु,वडाळी, इं गा रामपूर, नारखेड ,दादगाव ,श्रीधरनगर,वर्णा,पोरज घाणेगाव,वळती खु,वासाडी बु,वडगाव,रसूलपुर, निमगाव, अवधा बु., हिंगणा दादगाव,डोलारखेड गेरू, दीवठाणा, तांदुळवाडी,ज्ञानगंगापूर, वळती बु, धानोरा खु, खातखेड, नारायणपूर अवधा खु.,हिंगणा इसापूर,वरधा…

Related posts

वंचित कडून सतीश पवार विरुद्ध पोलिसात तक्रार…

nirbhid swarajya

Check Out Valve’s New VR Controller Prototype In Action

admin

कडक शिस्तीचे एएसपी श्रवण दत्त होणार दोन दिवसात रुजू

nirbhid swarajya
error: Content is protected !!