खामगाव: तालुक्यातील ज्ञानगंगापूर येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थीनीचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थिनी अस्मिता सतीश पैठणकर या विद्यार्थिनीचा वाढदिवस आज शाळेमध्ये साजरा करण्यात आला यावेळी गावातील युवा सरपंच ज्ञानेश्वर महाले यांनी वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप केला तसेच शाळा समिती अध्यक्ष प्रशांत पैठणकर यांनी विद्यार्थिनी च्या हस्ते वृक्षारोपण केले. वृक्षारोपण करून वृक्षाचे संगोपन सुध्दा विद्यार्थी करणार आहेत. ज्ञानगंगापूर येथील विद्यार्थी व सरपंच गावातील नागरिक यांनी एक नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.असे उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्यात यावे असे ज्ञानगंगापूर येथील सरपंच महाले यांनी बोलताना सांगितले.
यावेळी उपस्थित गावचे सरपंच ज्ञानेश्वर महाले, शाळा समिती अध्यक्ष प्रशांत पैठणकर,मुख्याध्यापक तायडे सर,पाटील सर,विकास बांगर , सतीश पैठणकर,भागवत महाले,तसेच ज्ञानगंगापूर येथील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
previous post