खामगांव : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ या दिवशी राज्याभिषेक झाला होता. या दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिवस्वराज्यदिन साजरा करण्याचे तसेच राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्याचे आवाहनमहाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री यांनी केले होते. त्या अनुषंगाने ज्ञानगंगापुर ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.
यावेळी स्वराज्यगुढी जवळ फुलांची सजावट करण्यात आली आणि ज्ञानगंगापुर ग्रामपंचायत चे सरपंच ज्ञानेश्वर महाले यांनी शिवस्वराज्य दिनानिमित्त स्वराज्यगुढीचे पूजन केले. तर उपसरपंच सुरेश सुर्यवंशी यांनी सुद्धा स्वराज्यगुढीचे पूजन केले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करून स्वराज्य गुढीला नमन करण्यात आले. शिवस्वराज्य सोहळ्यानिमित्त यावेळी या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य रणदीप नितोने,विकास बांगर, योगेश महाले, सचिव तेलंग, शिपाई भागवत महाले शिक्षक पाटील सर आशा सेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस दीपक खराडे व गावकरी उपस्थित होते.