बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील नागरिक सत्कार समारंभ आयोजन करण्यात आले होते त्यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेन्द्र शिंगणे बोलत होते. चिखली येथे महाविकास आघाडी व नागरिकांच्या वतीने मंत्री डॉ.राजेंद्र शिंगने यांचा नागरिक सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता .शहरातून भव्य मिरवणूक काढून शेवटी मौनीबाबा मठ च्या प्रांगणात सत्कार समारंभ संपन्न झाला .यावेळी सत्काराला उत्तर म्हणुन शिंगणे म्हणाले की बुलडाणा जिल्ह्यात अवैध धंदे जोमात सुरु असल्याची माहिती मिळते आहे, यापुढे जिल्ह्यात गुटखा विक्री, जुगार, वरली मटका, अवैध दारू विक्री यासारख्या अवैध धंद्याना जिल्ह्यात थारा मिळणार नाही, जोपर्यन्त मि पालकमंत्री आहे तोपर्यंत जिल्ह्यात कुठलेच अवैध धंदे चालू देणार नाही अशी स्पष्टकती मंत्री डॉ शिंगने यांनी केली, त्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्या व त्यांना साथ देणाऱ्या संबधित विभागाच्या अधिकारी कर्मचार्यां मध्ये धास्ती निर्माण झाल्याचे दिसून आले.