January 1, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा

जोशी नगरातील छकुली गार्डनमध्ये दोन गट आमने सामने

परिसरात भीतीचे वातावरण,चिडीमारीचे प्रमाण वाढले

खामगाव: जोशी नगर भागातील छकुली गार्डन मध्ये आज रात्री १० सुमारास मुलीच्या छेडखानीच्या वादातून दोन गट आमने-सामने आल्याची घटना घडली आहे या घटने मुळे जोशी नगरात तणाव निर्माण झाले होते ही घटना गुरूवारी रात्री १० वाजता सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.शहरातील जोशी नगरात छकुली गार्डन आहे. या गार्डनमध्ये जोशी नगरासह शिवाजी वेस, गोपाळ नगरातील मुलं-मुली विरंगुळा म्हणून फिरायला येतात. अशातच गत काही दिवसांपासून येथे टवाळखोर युवकांचा त्रास वाढला असून चिडीमारीचे प्रमाण वाढले आहे.

गुरूवारी रात्री मुलीच्या छेडखानीवरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी भांडण आवरण्यास गेलेले माजी नगरसेवक ओम शर्मा यांनाही युवकांनी लोटपाट केली. या घटनेत दोघे जखमी झाल्याचे समजते. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रकीया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त जमावाच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चांगलीच दमछाक करावी लागली.ल जोशी नगरात दोन गट आमने सामने आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Related posts

प्रेमप्रकरणातून युवकाचा खून , प्रेयसी कडील मंडळीविरुद्ध 8 आरोपींविरुद्ध गुन्हा, दोन आरोपी अटक तर सहा फरार, संग्रामपूर तालुक्यातील घटना.

nirbhid swarajya

खामगांवमधे लव्ह जिहाद प्रकरण उघड़किस;खोटी ओळख सांगून केले लग्न

nirbhid swarajya

घरपोच बि बियाणे, खत सुविधेची प्रतीक्षा

nirbhid swarajya
error: Content is protected !!