बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याचा खामगाव तालुक्यातील वाडी भागातील टेक्निकल शाळेसमोर मुलींच्या नवीन वसतीगृहाचे बांधकाम सुरू आहे या ठिकाणी काल रात्री या दरम्यान वस्तीगृहाच्या गेटजवळ जेसीबी क्रमांक एम एच 28 ए झेड 0428 ने खोदकाम सुरू होते या दरम्यान त्या ठिकाणी असलेले मिलिंद गौतम गव्हांदे वय 30 वर्ष राहणार उमरा यांना जेसीबीच्या जबर धडक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटना ही रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली असल्याचे जेसीबी चालक मालक संतोषी विठ्ठल चव्हाण राहणार वाडी यांच्या निदर्शनास आले मृतक मिलिंद गव्हांदे हे वाडी येथील विनोद बुद्ध प्रकाश चोटमल त्यांच्या घरी आले होते घटनेची माहिती मिळताच मृतकाचे नातेवाईकाची घटनास्थळी पोहोचले होते याप्रकरणी विनोद चोटमल यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून संतोष चव्हाण यांच्याविरुद्ध भादवि कलम 279 304 अ नुसार करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्या जात असून या घटनेबाबत शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे.
previous post