April 11, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

जुगारी कर्मचारी पकडले; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

खामगाव : सेवानिवृत्त झाल्यानंतर सहकारी कर्मचाऱ्यांना घेऊन पार्टी रंगली होती. यामध्ये,शबाब सोडून सर्वच होते. कर्मचाऱ्यांचा एन्जॉय सुरू असताना पोलिसांनी धाड टाकून मजा खराब केला. मिळालेल्या माहितीनुसार जीवन प्राधिकरण प्राधिकरणाचा एक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांनी सेवानिवृत्तीच्या सेंड ऑफ साठी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये पार्टीची आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दारू व ताश पत्त्यासह मस्त पार्टी सुरू होती. याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना कळताच त्यांनी तेथे धाड़ मारून नगरपरिषदेच्या व जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांसह सात कर्मचार्‍यांना जुगार खेळताना रंगेहात पकडले आहे. यामधे रमेश वानखडे रा.किसन नगर, मुरलीधर बर्डे रा.भाटिया ले आऊट, नरेंद्र खडसे रा.भाग्योदय कॉलनी, रामदास लोखंडे रा.गुरुदत्त नगर, अशोक इंगळे रा. शिक्षक कॉलनी, कैलास पारखेडकर रा. सुटाळा बु. ,शेषराव शेगोकार रा. बर्डे प्लॉट यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांच्या जवळून एक स्कॉर्पिओ गाडी,४ दुचाकी व ३ मोबाईल तसेच नगदी असा एकूण ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वृत्त लिहीपर्यंत पुढील कारवाई सुरू होती.ठाणेदार अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नगरचे ए पी आय रवींद्र लांडे, पो ना संदीप टाकसाळ, देवेंद्र शेळके अरविंद बडगे,सागर राऊत, पो.का रवींद्र कन्नर यांनी ही कारवाई केली आहे.

Related posts

अजिंठा सफारीवरुन सी-1वाघोबा परतले…वाघिणीसाठी वाघोबा ची भटकंती कायम…कधी होणार मिलन…?

admin

शाळेच्या आवारात दारुच्या पार्ट्या

nirbhid swarajya

बुलडाणा जिल्हा कोरोना मुक्तीकडे

nirbhid swarajya
error: Content is protected !!