खामगांव : येथील सतीफैल भागात पैशाच्या हारजीत वर एक्का बादशाह जुगार खेळताना व खेळविताना पोलिसांना मिळून आले. या प्रकरणी शहर पोलिसांनी दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक सतीफैल भागात दिपक अजय करपे वय १८, विकास रमेश उज्जैनवार वय ३५, गोकुल रूपचंद बोर्डे वय १८, प्रकाश घनश्याम गौरव वय २६, सतीश दगडू बेटवाल वय ३४, नरेश फुलचंद बशीरे वय २६,गणेश गजानन तायडे वय २७, राहुल उत्तम तायडे वय २६, विशाल उर्फ गोलू गणेश मुधोळकर, अमर सुभाष तायड़े सर्व रा खामगांव हे मुधोळकर यांच्या घरसमोर पैशाच्या हारजीत वर एक्का बादशाह नावाचा जुगार खेळताना व खेळविताना पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून नगदी 9 हजार 375 व ताश पत्त्यासह ६ अँनरॉइड मोबाइल किं 17,700 असा एकून २७ हजार १६५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी API धीरज बांडे यांच्या फिर्यादि वरुन आरोपीं विरुद्ध कलम १२ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.