April 18, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

जुगारावर छापा ; सव्वा लाखाचा उद्देमाल जप्त

खामगांव :शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सारोळा शिवारात एक्का बादशाह नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती वरून छापा टाकला असता ३ दुचाकीसह जवळपास सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार तालुक्यातील सारोळा शिवारात एका शेतात एक्का बदशाहा नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सारोळा शिवारातील एका शेतात काल १२ मे रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास जुगारावर छापा मारला असता गोपाळ नगर येथील सुरज प्रसाद दाणे २६ व जयसिंग प्रल्हाद सोळंके ३६ हे दोघाना पैशाच्या हारजीत वर जुगार खेळताना मिळुन आले. त्यांच्याजवळून ३ दुचाकी, एक मोबाईल,बावन ताश पत्ते असा एकूण १ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पो.कॉ रवींद्र कन्नर यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त दोघांविरुद्ध मजूका कलम १२ अ सह कलम १८८,२६९,२७० भा.दं.वि.सहकलम -५१ ब आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ सहकलम २,३,४साथीचा रोग अधिनियम १८९७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामातून कोट्यावधी रुपयांचे धान्य गायब

nirbhid swarajya

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये विद्यार्थी स्वयंप्रशासन व शिक्षकदिन साजरा…

nirbhid swarajya

आषाढी एकादशी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

nirbhid swarajya
error: Content is protected !!