April 4, 2025
बातम्या

जीवाश्मच्या ‘पाऊलखूणा’ (Fossil Footprint )

जिवांचे जमिनीच्या आत गाडले गेलेले अंश…मृत मानव, प्राणी, वनस्पती यांचे नैसर्गिकरित्या जतन केले गेलेले अवशेष म्हणजे जीवाश्म होय. ते खडकांमध्ये, नदी किंवा समुद्रतळाशी पडलेल्या गाळामध्ये तयार होतात. ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राखेच्या चिखलातून चालत गेलेल्या मानवाच्या पावलांचे ठसे त्या चिखलावर उमटतात. पुढे विविध कारणांनी त्या चिखलांचे खडकात रूपांतर होते. अशा ठशांवरून प्राचीन काळी त्या ठिकाणी वावरत असलेल्या मानवाच्या, प्राण्यांच्या पावलांचा आकार, त्यांच्या बोटांची संख्या, नखांचे स्वरूप यांची माहिती मिळू शकते.
असाच एक मानवी पायाचा ठसा ( Human footprint) माझ्या गावी गुडाळ ता. राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथे अस्तित्वात आहे. हा ठसा मला काही नव्यानं सापडलेला नाही. मी लहानपणापासून त्याबाबतच्या भाकड कथा ऐकत आलो आहे. पण मला कधी त्याची उत्सुकता वाटली नाही. गेल्या चार महिन्यात लाॅकडाऊनमुळे डोंगर, दऱ्या, जंगल आणि त्याच्या सभोवतालचा निसर्ग बरच काही शिकवून गेला. त्यामुळे हजारो वर्षापासून उन, वारा आणि पावसात अजून आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेला जीवाश्म नेमका कधीचा आहे? हे सांगता येत नाही. एक मात्र नक्की आहे कि, हे ‘पदचिन्ह’ ( Footprint) स्पष्टपणे माणासाचेच असून ते अत्यंत पुरातन काळातील आहेत. या पावलातील बोटांचे ठसेही सुस्पष्ट आहेत. पावलाचा आकार, अंगठा आणि बोटे यांची रचना मानवी पावलाचे स्पष्ट संकेत देतात. त्या शेजारीच एका टाचेचा आकार आहे.

या खडकाची बरीचशी धूप झालेली आहे. त्याच्या शेजारीच दगडखाण सुरू केली होती. त्या खाणींच्या स्फोटातून हे जीवाश्म वाचले ही जमेची बाजू आहे. ते नष्ट होण्याआधी जतन करणे फार महत्वाचं आहे. मला याची उत्सुकता वाटली म्हणून मी लगेचच यावर संशोधन करणाऱ्या संस्थाचा शोध घेतला. यामध्ये अमेरिकेच्या The Paleontological Society या संस्थेशी इमेल द्वारे संपर्क साधला. ही संस्था केवळ जीवाश्मावर काम करते. तर भारतात Indian Institute of Science Education and Research (IISER-K), Kolkata आणि काही विद्यापीठातील एका विभागात संशोधन केले जाते. पण अमेरिकेतील या संस्थेत फक्त जीवाश्म या विषयावरच संशोधन केले जाते. आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याची सुविधा अतिशय सहज सोपी आहे. म्हणून या संस्थेशी मी ईमेल द्वारे माझ्या गावातील जीवाश्माचे ( मानवी पायाचा ठसा ) फोटो पाठवले आहेत. तसेच या बाबतची लोकेशन पाठवली आहे. त्यावर त्यासंस्थेचा रिप्लाय आला असून FOSSIL ID FORM आता संस्थेकडे केवळ नोंद झाली आहे. त्याची सविस्तर माहीती लवकर मिळेल ही अपेक्षा….
तसं पाहिलं तर मानवी उत्क्रांतीच्या क्षेत्रात नवनवीन जीवाश्मांचा शोध लागतो. पूर्वीच्या काळात मिळालेल्या जीवाश्मांचा नव्याने अभ्यास होतो. जीवाश्म संशोधनामुळे मिळालेल्या माहितीवर आधारित नवे सिद्धांत मांडले जातात. त्यामुळे गुडाळ गावातील या जीवाश्म चे संशोधन होणे गरजेचे आहे.

  • चंद्रकांत पाटील
  • मु पो गुडाळ ता. राधानगरी
  • जि. कोल्हापूर
  • 7021602488
  • WA- 9594502526
  • Email- deccanking25@gmail.com

Related posts

पीक कर्जाची बँक व्यवस्थापकाची पॅन कार्डची सक्ती

nirbhid swarajya

ब्राह्मणवाडा येथील जि प प्रा शाळेचा नवोपक्रम “एक मूल एक झाड”

nirbhid swarajya

तहसिलदारा यानी हातात तिफन घेत तलाठी,मंडळधिकारीसह केली शेतात जाऊन पेरणी…!

nirbhid swarajya
error: Content is protected !!