बुलडाणा : एकीकडे कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून उपाययोजना राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाच्या वतीने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम सुरू झाली आहे.आणि त्यातच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे अवर सचिव यांनी दिले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित यांच्या संदर्भात लोकप्रतिनिधींसह जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या जागी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कान नाक घसा तज्ञ डॉ.सुरेश घोलप यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे.
previous post