बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 101 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 94 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये खामगांव येथील 18 वर्षीय महिला व 32 वर्षीय महिला, साखरखेर्डा ता. सिं. राजा येथील 35 वर्षीय महिला, शक्तीनगर मलकापूर येथील 75 वर्षीय पुरूष, मलकापूर येथील 24 वर्षीय महिला, बुलडाणा येथील 19 वर्षीय तरूण व माळवंडी ता. बुलडाणा येथील 40 वर्षीय पुरूष रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 7 रूग्ण पॉझीटीव्ह आढळले आहे. तसेच आजपर्यंत 2792 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 154 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 154 आहे. तसेच आज 2 जुलै रोजी 101 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 7 पॉझीटीव्ह, तर 94 निगेटीव्ह आहेत. आज रोजी 293 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2792 आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 260 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 154 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 94 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 12 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
previous post