April 17, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात 82 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 22 पॉझिटिव्ह

चार रूग्णांची कोरोनावर मात, मिळाली सुट्टी


बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 104 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 82 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 22 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये आळसणा ता. शेगाव येथील 55 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, 10 वर्षीय मुलगी, 8 वर्षीय मुलगी, 2 वर्षीय मुलगी, 6 वर्षीय मुलगा, 3 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय मुलगा, 38 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगी आणि 30 वर्षीय पुरुष रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे आळसणा ता. शेगाव येथे 12 रूग्ण आढळले आहे. तसेच जामठी धाड ता बुलडाणा येथील 26 व 28 वर्षीय महिला, इंदिरा नगर चिखली येथील 55 वर्षीय महिला, नांदुरा येथील 44 व 41 वर्षीय पुरुष, सुलतानपूर ता. लोणार येथील 35 वर्षीय पुरुष, 6 वर्षाची मुलगी, जळगाव जामोद येथील 57 वर्षीय महिला, टेंभुर्णा ता. खामगाव येथील 20 वर्षीय तरुण आणि मूळ पत्ता बोदवड, जि. जळगाव येथील सध्या मलकापूर येथे असलेली 24 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे.तसेच आज 4 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आहे. त्यामध्ये धामणगाव बढे ता. मोताळा येथील 42 वर्षीय महिला, 47 वर्षीय महिला, डोणगाव ता मेहकर येथील 22 वर्षीय पुरूष आणि मलकापूर येथील 45 वर्षीय पुरूष रूग्णाला आज सुट्टी देण्यात आली आहे.
आजपर्यंत 3075 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 176 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 176 आहे. तसेच आज 5 जुलै रोजी 104 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 22 पॉझीटीव्ह, तर 82 निगेटीव्ह आहेत. आज रोजी 290 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 3075 आहेत.जिल्ह्यात आज अखेर एकूण 300 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 176 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 111 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 13 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

खामगाव ते नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ढाब्यावर उभ्या तीन ट्रकच्या टाकीतून ४२५ डिझेल लंपास…

nirbhid swarajya

स्वाभिमानीचे राणा चंदन यांचे दुःखद निधन

nirbhid swarajya

खामगाव तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची सभा संपन्न,अनेक प्रकरणांना मंजुरात

nirbhid swarajya
error: Content is protected !!