खामगाव : येथील उपविभागीय महसूल अधिकारी मुकेश चव्हाण यांची अकोला येथे प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासह जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज धडकले आहे. covid-19 च्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2020 – 21 आर्थिक वर्षातील बदल्यांच्या सूचना महसूल विभागाकडून काढण्यात आल्या आहेत, यामध्ये खामगाव येथील उपविभागीय महसूल अधिकारी मुकेश चव्हाण यांची बदली अकोला येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी पदावर करण्यात आली आहे. तर मलकापूर येथील उपविभागीय महसूल अधिकारी सुनील विंचनकर यांची बदली वाशिम येथे उपजिल्हाधिकारी पदी करण्यात आली आहे.तसेच बुलढाणा उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत यांची बदली वाशिम जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर करण्यात आली आहे.
next post