बुलडाणा – काल बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी वाऱ्यासह अवकाळी पावस झाला तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेले गहू , हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे व ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावल्या जातो की काय यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. खामगाव तालुक्यातील बोरी- अडगाव, आंबेटाकळी, अंत्रज, लाखनवाडा सह परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. ज्यामुळे शेतातील गहू या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील शेंबा परिसरात तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे.