जिल्ह्यासह राज्यात महाविकास आघाडी पायउतार झाल्यनंतर मागच्या १५ दिवसांपूर्वी पहिल्या टप्पातील ७ हजार पेक्षा जास्त ग्रामपंचातींची निवडणूक पार पडली.यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तारीख राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केली आहे. याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातही ७ हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा जाहीर झाल्या आहेत.या निवणुकांमुळे गावागावात धुरळा उडणार आहे. राज्य निवडणुक आयोगाने परिपत्रक जाहीर करून आचारसंहिताही लागू केली आहे. १८ डिसेंबर मतदानाची प्रक्रिया होणार आहे तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.राज्यात पहिल्या टप्प्यात ७६०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या आता दुसऱ्या टप्प्यात ७७०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.
खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नागपुर नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई मेहकर मोताळा राजकीय लोणार विदर्भ शेगांव संग्रामपूर सिंदखेड राजा