सिंदखेडराजा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पथक रवाना
बुलढाणा: सध्या बारावीची परीक्षा सुरू असून ही परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी यासाठी प्रशासन कार्यरत आहे. यासाठी विविध पथके सुद्धा गठीत करण्यात आली आहेत परंतु आज 3 मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून बारावीचा गणित विषयाचा पेपर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास समाज माध्यमावर व्हायरल झाला. म्हणजे सकाळी 11 वाजता पेपर सुरू होण्या अगोदरच प्रश्न पत्रिका फुटली होती.

ही बाब लक्षात आल्यानंतर शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी बुलढाणा माध्यमिक शिक्षण विभागाकडून एक पथक साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार देण्याकरिता रवाना झाल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली आहे.परंतु तांत्रिक बाबी मुळे पथक गुन्हा दाखल करण्यासाठी सिंदखेड राजा कडे रवाना झाले आहे आता ही तक्रार आम्ही सिंदखेड राजा पोलीस स्टेशन मध्ये देणार असल्याची माहिती जगन मुंडे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक,माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी दिली आहे आहे.