January 1, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात प्राप्त 376 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 184 पॉझिटिव्ह

127 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा :
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 560 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 376 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 184 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 166 व रॅपिड टेस्टमधील 18 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 242 तर रॅपिड टेस्टमधील 134 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 376 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर:5, चिखली तालुका: मेरा बू 2, सवणा 1, आंबाशी 4, सातगाव भुसारी 1, शिरपूर 1, करत वाडी 1, खामगाव शहर : 22, खामगाव तालुका : हिवरखेड 1, शिर्ला नेमाने 1, घाटपुरी 1, नांदुरा शहर : 13, जळगाव जामोद शहर : 9, जळगाव जामोद तालुका : वाडी खु 1, वडशिंगी 5, शेगाव शहर : 3, शेगाव तालुका : पहूर जीरा 1, कन्हारखेडा 3, भोनगाव 1, मोताळा तालुका : वडगाव 1, मोताळा शहर :2, मलकापूर शहर : 5, मलकापूर तालुका : झोडगा 1, सिंदखेड राजा तालुका : दुसरबिड 1, तडेगाव 3, साखर खर्डा 1, लोणार तालुका : तांबोळा 5, लोणार शहर :2, मेहकर तालुका : पिंपळगाव माळी 2, सोनाटी 2, कदमापुर 1, आरेगाव 2, कनका 2, दे. माळी 1, मेहकर शहर : 13, बुलडाणा शहर :32, बुलडाणा तालुका : दहिद बू 2, घानेगाव 1, सातगाव 1, दे. राजा शहर : 12, दे. राजा तालुका : आसोला 1, दे. माही 11, गिरोली खु 1, संग्रामपूर तालुका : बोडखा 1, मूळ पत्ता भुसावळ जि. जळगाव 1, औरंगाबाद 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 184 रूग्ण नवीन रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान धरणगाव ता. मलकापूर येथील 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


तसेच आज 127 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : कोवीड केअर सेंटर नुसार : खामगांव : 27, शेगांव : 24, मलकापूर : 3, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 18, अपंग विद्यालय 1, चिखली :15, लोणार : 19, मोताला: 3, मेहकर :2, नांदुरा :13, जळगाव जामोद:5,
तसेच आजपर्यंत 28824 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 5431 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 5431 आहे.
आज रोजी 1030 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 28824 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 6603 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 5431 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1088 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 84 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

ग्रामपंचायत काळेगांव चे गावातील रस्त्यांकडे दुर्लक्ष…

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 313 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 137 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

आज प्राप्त 19 कोरोना अहवाल निगेटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!