December 29, 2024
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात प्राप्त 181 कोरोना अहवाल निगेटीव्ह; 43 पॉझीटीव्ह

11 रूग्णांची कोरोनावर मात, मिळाली सुट्टी


बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी काल रात्री व आज असे एकूण 133 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 105 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 28 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. तसेच आजपासून रॅपीड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे कोरोना निदान करणे सुरू करण्यात आले आहे. या टेस्टच्या माध्यमातून आज 91 अहवाल प्राप्त झाले आहे. त्यामध्ये 76 निगेटीव्ह व 15 पॉझीटीव्ह अहवाल आहेत. अशाप्रकारे प्रयोगशाळेतून व रॅपीड टेस्टद्वारे एकूण 224 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामधून एकूण 181 निगेटीव्ह अहवाल प्राप्त असून 43 अहवाल पॉझीटीव्ह आहेत.
प्रयोगशाळेतून प्राप्त पॉझीटीव्ह अहवालामध्ये दाल फैल खामगाव येथील 35 व 26 वर्षीय पुरूष, वाडी खामगांव येथील 22 व 50 वर्षीय महिला, सती फैल खामगांव येथील 38 वर्षीय पुरूष, 75, 85 व 50 वर्षीय महिला, नांदुरा येथील 45 वर्षीय पुरूष, सिव्हील लाईन खामगांव येथील 45 वर्षीय पुरूष, हिवरखेड ता. खामगांव येथील 55 वर्षीय महिला, टिळक मैदान खामगांव येथील 45 वर्षीय पुरूष, गारखेडा ता. सिं.राजा येथील 38 वर्षीय पुरूष, 17 वर्षीय तरूणी, 15 वर्षीय मुलगा, वर्दळी ता. सिं.राजा येथील 32 वर्षीय पुरूष, मेहकर येथील 15 वर्षीय दोन तरूणी, 9 वर्षीय मुलगा, दुर्गापुरा दे.राजा येथील 78 व 50 वर्षीय पुरूष, 13 व 48 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, डिएसडी मॉल बुलडाणा येथील 44 वर्षीय पुरूष, मलकापूर येथील 40 वर्षीय पुरूष, बुलडाणा येथील 51 वर्षीय पुरूष, नांदुरा येथील 9 वर्षीय मुलगा अशाप्रकारे जिल्ह्यात प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालामध्ये 28 रूग्ण पॉझीटीव्ह आढळले आहे. त्याचप्रमाणे रॅपिड टेस्ट किटद्वारे प्राप्त पॉझीटीव्ह अहवालामध्ये शेगांव येथील 65 वर्षीय महिला, जमजम नगर शेगांव येथील 71 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय तरूण, 40 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महिला, 6 वर्षीय मुलगी, 36 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, आरोग्य कॉलनी शेगांव येथील 69 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय पुरूष, मेहकर येथील 64 वर्षीय पुरूष, चिखली येथील 55 वर्षीय महिला, डिएसडी मॉल बुलडाणा येथील 37 वर्षीय महिला, नांदुरा येथील 55 व 23 वर्षीय पुरूष संशयीत व्यक्तीचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. अशाप्रकारे रॅपिड टेस्टमधून 15 अहवाल पॉझीटीव्ह आहेत. तसेच आज 11 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये सुलतानपूर ता. लोणार येथील 55 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरूष, साखरखेर्डा ता. सिं.राजा येथील 48 वर्षीय पुरूष, सरंबा ता .दे.राजा येथील 49 वर्षीय पुरूष, मूळ पत्ता रेलूम ता. अकोट येथील व सध्या बुलडाणा येथे असलेले 65 वर्षीय पुरूष, बुलडाणा येथील 19 वर्षीय दोन तरूण, माळवंडी ता. बुलडाणा येथील 40 वर्षीय पुरूष, बस स्थानक परीसर खामगांव येथील 40 वर्षीय पुरूष, 14 वर्षीय मुलगा आणि काँग्रेस नगर शेगांव येथील 19 वर्षीय तरूणीचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत प्रयोगशाळेतून व रॅपिड टेसटद्वारे 3287 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 201 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 201 आहे. आज रोजी 271 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 3287 आहेत.जिल्ह्यात आज अखेर एकूण 343 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 201 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात प्रयोशाळेतून प्राप्त पॉझीटीव्ह अहवालातील 114 व रॅपिड टेस्ट किटमधील 15 अशाप्रकारे 129 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 13 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

हटकर गरबा उत्सव २०२२ उत्सव मंडप भूमिपूजन शुभारंभ

nirbhid swarajya

खामगांव ASP पथकाची दारू विक्रेत्यांविरोधात धडक मोहीम

nirbhid swarajya

बोरजवळा ग्रामसेवा सहकारी संस्थेवर ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

nirbhid swarajya
error: Content is protected !!