November 20, 2025
बातम्या

जिल्ह्यात एक वर्षात ५५६ मुली बेपत्ता..!१८ ते २५ वयोगटातील युवतीचे प्रमाण अधिक… सोशल मीडिया व विभक्त कुटुंब पद्धतीचा दुष्परिणाम..?

बुलडाणा जिल्ह्यात एक वर्षात ५५६ मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली असून यामध्ये १८ ते २५ वयोगटातील युवतींचे प्रमाण अधिक असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात २०१९ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या एक वर्षात मुलींचे अपहरण आणि बेपत्ता असल्याच्या ५५६ तक्रारींची नोंद करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये १८ वर्षाच्या आतील ८४ तक्रारी तर १८ ते २५ वयोगटातील ४७२ तक्रारी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.यापैकी ४३१ प्रकरणांचा छळा लागला असून अजूनही १२५ मुली बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.दिवसेंदिवस वयात आलेल्या मुली घरून पळून जाणे किंवा मुलींना फूस लावून पळून नेने अश्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे शासकीय आकडेवारी नुसार समोर आले आहे , त्यामुळे पालकच नव्हे तर सर्वांसाठीच हा चिंतनाचा विषय ठरत आहे, तर आधी आपल्या देशात संयुक्त कुटुंब पद्धती होती ज्यामध्ये वयात आलेल्या मुला-मुलींना प्रेम – जिव्हाळा मिळत होता , सोबतच सोशल मिडियाचेही प्रमाण नसल्यागत होते , आता विभक्त कुटुंब पद्धती आली आणि सोशल मीडियाचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढलाय त्यामुळे सोशल मीडियावर प्रेमाच्या उदात्तीकरणाच्या अतिरेकामुळे तरुणी कुटुंबियांच्या भावनांचा विचार न करता घरून पलायन करण्याचे धाडस करत असल्याचे मत अभ्यासकांकडून त्याच बरोबर महिला सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे.तर मुलींना फूस लावून पळऊन नेल्याच्या अनेक तक्रारी पालकांनी पोलिसात केल्यात , मात्र याला काही प्रमाणात पालक देखील जबाबदार असल्याने वयात आलेल्या मुलामुलींना विश्वासात घेऊन विचार विनिमय करणे , त्यांना वेळ देणे सोशल मीडियाचा अतिरेक टाळणे ही खबरदारी पालकांनी घेतल्यास अश्या घटनांना आळा बसेल एवढे मात्र निश्चित.

Related posts

सरपंच उन्हाळे यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

nirbhid swarajya

नकली नोटांचे मोठे रॅकेट पकडण्यात पोलिसांना मोठे यश….

nirbhid swarajya

आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत तथा साहित्यीक मा.प्रविणजी पहूरकर यांचा सत्कार व व्याख्यान…

nirbhid swarajya
error: Content is protected !!