पाच रूग्णांची कोरोनावर मात
बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 95 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 90 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 5 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये आळसणा ता. शेगांव येथील 50 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय पुरुष, मूळ पत्ता देऊळगाव गुजरी ता. जामनेर असलेली 54 वर्षीय महिला, मूळ पत्ता रेलमु ता. अकोट असलेले 65 वर्षीय पुरूष व कोलारा, ता. चिखली येथील 67 वर्षीय महिला रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे 5 अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहे. मूळ पत्ता देऊळगाव गुजरी, ता. जामनेर असलेल्या मात्र बुलडाणा कोविड केअर सेंटर येथे दाखल असलेल्या 54 वर्षीय महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तसेच आज 5 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये भीमनगर मलकापूर येथील 45 वर्षीय पुरूष, धामणगाव बढे ता मोताला येथील 22 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष व 5 वर्षीय मुलीचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 2601 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 152 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 152 आहे. तसेच आज 30 जुन रोजी 95 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 5 पॉझीटीव्ह, तर 90 निगेटीव्ह आहेत. आज रोजी 164 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2601 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 235 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 152 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 71 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 12 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.