46 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 105 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 84 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 21 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 15 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 18 तर रॅपिड टेस्टमधील 66 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 84 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा : गाडगे नगर 1, सरस्वती नगर 1, विष्णूवाडी 1, माळेगांव ता. मोताळा : 1, हनवतखेड ता. सिं.राजा : 2, खामगांव : 1, जलालपूरा 1, सुदर्शन नगर 1, गोपाल नगर 4, सुटाळा 2, वाडी 2, भालेगांव बाजार ता. खामगाव : 3, जोशीनगर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 21 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 46 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : पोलीस वसाहत 10, जानकी कॉम्प्लेक्स 1, सुटाळा 1, शिक्षक कॉलनी 2,शंकर नगर 1, सती फैल 2, झोडगा वसर ता. खामगांव : 1, पिं.काळे ता. जळगांव जामोद : 1, सुलतानपूर ता. लोणार : 1, मेहकर : 6, जानेफळ ता. मेहकर : 1, घाटबोरी ता. मेहकर : 1, लोणार : 10, चिखली : 6, येसापूर ता. लोणार : 1, दहीफळ ता. लोणार : 1.
तसेच आजपर्यंत 14216 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1399 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1399 आहे. आज रोजी 243 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 14216 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2252 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1399 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 813 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 40 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.