तीन रूग्णांची कोरोनावर मात; मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 86 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 81 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 05 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे मलकापूर येथील 65 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरूणी व 45 वर्षीय महिला रुग्णाचा आहे. तसेच शेलापूर ता. मोताळा येथील 55 वर्षीय पुरूष व 50 वर्षीय महिला आहे. त्याचप्रमाणे आज बुलडाणा कोविड केअर सेंटर येथून मलकापूर येथील रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये भीमगनर, मलकापूर येथील 60 वर्षीय महिला, मलकापूर येथीलच 43 वर्षीय पुरूष व 39 वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे सर्व पूर्वी आलेल्या 38 वर्षीय कोरोना बाधीत पुरुषाच्या निकट संपर्कातील होते.
तसेच आतापर्यंत 1542 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 90 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत 56 कोरोनाबाधीत तीन रूग्णांची कोरोनावर मात; मिळाली सुट्टी
रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 56 आहे. सध्या रूग्णालयात 31 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच आज 8 जुन रोजी 86 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 05 पॉझीटीव्ह, तर 81 निगेटीव्ह आहेत. आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 29 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1542 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.