57 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 880 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 798 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 82 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 64 व रॅपिड टेस्टमधील 18 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 379 तर रॅपिड टेस्टमधील 419 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 798 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव तालुका : निमकवळा 3, पिं.राजा 1, अटाळी 1, खामगांव शहर : 2, जळगांव जामोद शहर : 5, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 3, नांदुरा शहर : 3, नांदुरा तालुका : भोटा 6, लोणार तालुका : वझर आघाव 1, पार्डा 1,पळसखेड 6, गायखेड 1, लोणार शहर : 11, दे. राजा तालुका : दे. मही 1, दे.राजा शहर : 1, बुलडाणा शहर : 5, बुलडाणा तालुका : हनवतखेड 1, चिखली तालुका : धोडप 1, माळशेंबा 1, खैरव 4, टाकरखेड हेलगा 1, हिवरा 1, चिखली शहर : 4, मेहकर तालुका : मोळा 1, हिवरा आश्रम 1, गोहेगांव 1, उकळी 1, मेहकर शहर : 4, संग्रामपूर तालुका : बावनबीर 1,शेगांव शहर : 3, मलकापूर शहर : 5, मलकापूर तालुका : कुंड खु 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 82 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे शेगांव येथील 65 वर्षीय महिला व घाटपुरी ता. खामगांव येथील 60 वर्षीय महिला रूग्णाचा उपचारादरम्यान खामगांव कोविड रूग्णालयात मृत्यू झाला आहे.

तसेच आज 57 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 4, चुनावाला हॉस्पीटल 13, खामगांव : 9, नांदुरा : 1, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 4, स्त्री रूग्णालय 1, मेहकर : 3, जळगांव जामोद : 3, लोणार : 2, शेगांव : 1, दे. राजा : 5, मलकापूर : 4, सिं. राजा : 7,
तसेच आजपर्यंत 39435 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8107 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8107 आहे.
आज रोजी 1583 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 39435 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8876 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8107 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 650 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 119 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.