October 6, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 796 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 76 पॉझिटिव्ह

56 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा :
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 872 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 796 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 76 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 67 व रॅपीड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 519 तर रॅपिड टेस्टमधील 277 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 796 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा तालुका : चांडोळ 2, वरवांड 1, खामगांव तालुका : जनुना 7, गवंढाळा 3, वहाळा खुर्द 1, घानेगाव 1, चिखली शहर : 1, चिखली तालुका : गोद्री 1, टाकरखेड भागीले 2, मोताला शहर :1, मोताळा तालुका : धामणगाव बढे 2, बोरखेडी 1, कोराळा 1, पान्हेरा खेडी 1, आडविहिर 2, दे. राजा शहर : 2, दे. राजा तालुका: सावंगी माळी 2, लोणार तालुका : खापरखेड 2, मेहकर तालुका : लोणी गवळी 1, लोणी काळे 2, पिंपळगाव 1, घाटबोरी 1, पांगरखेड 1, सिंदखेड राजा तालुका: उमरद 2, रुमणा 10, सिंदखेड राजा शहर : 1, जळगाव जामोद शहर : 5, जळगाव जामोद तालुका : पळशी सुपो 1, वाडी खुर्द 1, अकोला खुर्द 1, सातळी 2, वडगाव पाटण 3, बुलडाणा शहर : 1, संग्रामपूर तालुका: निवाना 1, मेहकर शहर : 5, खामगाव शहर : 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.

अशाप्रकारे जिल्ह्यात 76 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान महसूल कॉलनी, जळगाव जामोद येथील 85 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 56 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : मेहकर : 8, दे. राजा : 8, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 11, नांदुरा : 2, जळगाव जामोद: 4, लोणार: 23.
तसेच आजपर्यंत 50756 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 9195 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 9195 आहे.
आज रोजी 4078 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 50756 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9803 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 9195 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 478 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 130 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

खामगांव शहर पोलिसांची ७ हजार वाहनधारकांवर कारवाई!

nirbhid swarajya

दुकाने उघडण्याचे परवानगीसाठी नाभिक समाजाचे निवेदन

nirbhid swarajya

प्रिंपि देशमुख येथे पार पडला रजिस्टर मॅरेज

nirbhid swarajya
error: Content is protected !!