बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 86 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 75 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 11 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये नांदुरा येथील 20 वर्षीय पुरूष, 20 वर्षीय तरूण, 62 वर्षीय पुरूष, आळसणा ता. शेगांव येथील 35 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय पुरूष, 8 वर्षीय मुलगी, सती फैल खामगांव 88 वर्षीय वृद्ध पुरूष, फाटकपूरा खामगांव येथील 54 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय मुलगी, 42 वर्षीय महिला व राणी पार्क जळगांव जामोद येथील 22 वर्षीय महिला रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 11 रूग्ण पॉझीटीव्ह आढळले आहे.
यामध्ये सती फैल खामगांव येथील 88 वर्षीय वृद्ध पुरूष रूग्णाचा 2 जुलै 2020 रोजी उपचारादरम्यायन मृत्यू झाला आहे. तसेच आज 8 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये मलकापूर येथील 4 व धा.बढे ता. मोताळा येथील 4 रूग्णांचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 2867 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 162 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 162 आहे. तसेच आज 3 जुलै रोजी 86 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 11 पॉझीटीव्ह, तर 77 निगेटीव्ह आहेत. आज रोजी 318 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2867 आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 271 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 162 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 96 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 13 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
previous post