January 4, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 695 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 151 पॉझिटिव्ह

121 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 846 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 695 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 151 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 142 व रॅपिड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 536 तर रॅपिड टेस्टमधील 159 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 695 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगाव शहर: 29, शेगाव तालुका : पहूर जिरा 2, पळशी खुर्द 1, जवळा 1, सिं. राजा शहर : 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : अंबाशी 1 दे. राजा शहर: 1, जळगाव जामोद शहर: 5, जळगाव जामोद तालुका : गाडेगाव 2, बुलडाणा शहर: 9, बुलडाणा तालुका: मासरुळ 1, मलकापूर तालुका: भाडगणी 1, दाताळा 1, मलकापूर शहर: 7, मोताला तालुका : धा. बढे 1, लोणार तालुका : भुमराळा 3, सावरगाव 1, सुलतानपूर 2, मांडवा 6, दहिफळ 2, हनवत खेड 1, लोणार शहर: 11, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 5, गुंज 1, खेडी 5, पान्हेरा 1, पिंपळपाटी 1, खामगाव शहर : 10, खामगाव तालुका : विहिगाव 1, शिरसगाव निळे 3, मांडका 1, अटाळी 2, पिंपळगाव राजा 1, गरडगाव 1, नांदुरा शहर :17, नांदुरा तालुका : वडनेर 2, मालेगांव गोंड 1, मेहकर तालुका : देऊळगाव साकर्षा 4, मूळ पत्ता धोपटेश्र्वर ता. बदनापूर जि. जालना 2, करमाळा जि. उस्मानाबाद 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 151 रूग्ण नवीन रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान नांदुरा येथील 50 वर्षीय व साखर खेरडा ता. सिंदखेड राजा येथील 52 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


तसेच आज 121 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : कोवीड केअर सेंटर नुसार : खामगांव : 16, शेगांव : 12, मलकापूर : 11, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 23, चिखली : 5, दे. राजा : 18, लोणार : 3, सिंदखेड राजा: 6, मोताला: 2, मेहकर :25.
तसेच आजपर्यंत 28448 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 5304 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 5304 आहे.
आज रोजी 1054 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 28448 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 6419 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 5304 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1032 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 83 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

श्रमदानातून उमरा गावातील लोकांनी तयार केला वनराई बंधारा…

nirbhid swarajya

माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात वंचित चे उमेदवार अनिल अंमलकार यांची पोस्ट ला तक्रार…

nirbhid swarajya

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वीज वितरण कंपनी ग्रामिण आर-१ सेंटरच्या कार्यालयात “ठीय्या आंदोलन”

nirbhid swarajya
error: Content is protected !!