January 4, 2025
आरोग्य जिल्हा

जिल्ह्यात आज प्राप्त 64 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 06 पॉझिटिव्ह

सहा रूग्णांची कोरोनावर मात; मिळाली सुट्टी

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 70 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 64 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 06 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे भिमनगर, मलकापूर येथील 62 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय तरूण, 60 वर्षीय महिला, धोंगर्डी ता. मलकापूर येथील 70 वर्षीय वृद्ध, मलकापूर येथीलच 45 व 55 वर्षीय पुरूष रुग्णांचे आहे. त्याचप्रमाणे आज बुलडाणा कोविड केअर सेंटर येथून साखरखेर्डा ता. सिं. राजा येथील 04 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे  त्यांना  वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये 62 वर्षीय महिला, 44 व 26 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय तरूणीचा समावेश आहे. तसेच खामगांव येथील कोविड रूग्णालयातून 2 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये 36 वर्षीय पुरूष समता कॉलनी, खामगांव व 27 वर्षीय महिला पुरवार गल्ली, खामगांव येथील रूग्णाचा समावेश आहे. अशाप्रकारे 6 रूग्णांना आज सुट्टी मिळाली आहे.   त्याचप्रमाणे बुलडाणा कोविड रूग्णालयात धोंगर्डी ता. मलकापूर येथील 70 वर्षीय वृद्ध 9 जुन 2020 रोजी दाखल झाले होते. त्याच दिवशी रात्री आयसीयुमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा कोरोना नमुना तपासणी अहवाल आज पॉझीटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांची संख्या 04 झाली आहे. तसेच आतापर्यंत 1675 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 102 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी चार मृत आहे. आतापर्यंत 72 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 72 आहे.  सध्या रूग्णालयात 26 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.    तसेच आज 11 जुन रोजी 70 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 06 पॉझीटीव्ह, तर 64 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 12 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1675 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे

Related posts

नंदलाल भट्टड यांचे कृउबास खामगावच्या गैरकारभारा विरूद्ध एक दिवसीय लाक्षणीक उपोषण

nirbhid swarajya

वसीम रिझवी विरोधात शेगावात निवेदन

nirbhid swarajya

जिल्ह्यात आजप्राप्त 301 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 33 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!