57 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 671 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 524 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 147 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 101 व रॅपिड टेस्टमधील 46 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 216 तर रॅपिड टेस्टमधील 308 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 524 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 6, बुलडाणा तालुका : पोखरी 1, मेहकर तालुका : जानेफळ 1, डोणगांव 1, कळमेश्वर 1, मेहकर शहर : 11, खामगांव शहर : 3, सुटाळपुरा 6, बाळापुर फैल 2, फरशी 1, अमृतनगर 1, तलाव रोड 1, टावर लेआउट 1, केला नगर 1, डीपी रोड 1, जगदंबा रोड 1, खामगांव तालुका : कदमापूर 1, लाखनवाडा 1, शेगांव शहर : 5, व्यंकटेश नगर 3, जिजामाता नगर 1, माळीपुरा 1, नांदुरा तालुका : जिगाव 7, सिं. राजा तालुका : मातला 1, साखरखेडा 1, चिंचोली 4, दरेगाव 4, सिं. राजा शहर : 2, दे. राजा शहर : 3, माळीपुरा 1, दे. राजा तालुका : मेंडगांव 3, दे. मही 2, उंबरखेड 1, गारगुंडी 1, कार्ला 1, लोणार शहर : 9, मोताळा शहर: 7, मोताळा तालुका : धा. बढे 2, शेलापूर 1, संग्रामपूर : 7, जळगांव जामोद तालुका : वाडी खुर्द 3, खेर्डा 2, मडाखेड 3, चिखली शहर: 7, चिखली तालुका: मेरा बु 1, एक्लारा 1, भरोसा 1, जळगाव जामोद शहर: 8, नांदुरा शहर: 7, मलकापूर शहर: देशमुख नगर 1, लखानी चौक 1, मूळ पत्ता पारध भोकरदन जि जालना 2, धावडा 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 147 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मलकापूर येथील 45 वर्षीय पुरूष, मेहकर येथील 65 वर्षीय पुरूष, लोणी गुरव ता. खामगाव येथील 85 वर्षीय पुरुष, माटरगाव ता. शेगाव येथील 85 वर्षीय पुरूष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 57 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :
बुलडाणा शहर : 4, पैनगंगा अपारमेंट 1, बुलडाणा तालुका : धामणगाव धाड 1, मलकापूर शहर : हनुमान चौक 1, चैतन्य वाडी 2, शिवाजीनगर 1, मोताळा तालुका : शेलापूर 1, पोफळी 1, नांदुरा शहर : संकल्प कॉलनी 1, खामगांव शहर : घाटपुरी नाका 5, शंकर नगर 2, किसन नगर 5, वामन नगर 1, अनिकेत रोड 1, खामगांव तालुका : भालेगांव 7, माक्ता कोक्त 1, चिखली शहर : 7, चिखली तालुका : शिंदी हराळी 1, दे. राजा शहर : 6, लोणार तालुका : मातमळ 1, शेगांव शहर : व्यंकटेश नगर 1, जळगाव जामोद 4, मलकापूर तालुका: दसरखेड 1, मूळ पत्ता कुऱ्हा जि. जळगाव : 1. तसेच आजपर्यंत 19834 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2629 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2629 आहे. आज रोजी 1142 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 19834 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3752 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2629 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1066 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 57 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.