बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 54 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 52 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 02 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सदर अहवाल मलकापूर येथील 40 वर्षीय पुरूष आणि धरणगांव ता. मलकापूर येथील 70 वर्षीय वृद्धेचा आहे.
आतापर्यंत 1370 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 77 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत 47 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 47 आहे. सध्या रूग्णालयात 27 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच आज 4 जुन रोजी 54 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 2 पॉझीटीव्ह, तर 52 निगेटीव्ह आहेत. आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 74 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1370 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
previous post
next post