58 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 574 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 493 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 81 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाला मध्ये प्रयोगशाळेतील 77 व रॅपिड टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 194 तर रॅपिड टेस्टमधील 299 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 493 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मोताळा शहर : 2, बुलडाणा शहर : 8, बुलडाणा तालुका : दुधा 1, चौथा 2, दे. राजा शहर : 4, दे. राजा तालुका : सावखेड भोई 3, चिखली तालुका : मेरा बू 3, सवणा 3, खैरव 1, दिवठणा 1, लोणार शहर : 2, लोणार तालुका : खापरखेड घुले 1, नांदुरा शहर : 2, मेहकर शहर : 6, मेहकर तालुका : उकळी 1,बदलापूर 1, कळंबेश्वर 1, गुंजखेड 1, बऱ्हाई 1, काळेगाव 1, मोळा 4, पिंपळगाव माळी 1, देऊळगाव माळी 2, धानोरी 1, आरेगाव 5, जळगांव जामोद शहर : 6, जळगाव जामोद तालुका : आडोळ बू 1, मलकापूर शहर : 10, मलकापूर तालुका : धोंगर्डी 1, दाताळा 1, खामगाव तालुका : टेंभुर्णा 1, शिरसगाव देशमुख 1, मूळ पत्ता गवंधळा ता. रिसोड जि. वाशिम 1, धावडा ता. भोकरदन जि. जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 81 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 58 रूग्णांनी कोरोनावर मातकेल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : लोणार: 6, बुलडाणा : अपंग विद्यालय 8, आयुर्वेद महाविद्यालय 1, स्त्री रुग्णालय 1, दे. राजा : 6, चिखली : 6, मेहकर : 4, सिं. राजा: 2, खामगाव : 16, जळगाव जामोद : 1, नांदुरा : 2, शेगाव : 3, मलकापूर : 2. तसेच आजपर्यंत 37242 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8007 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8007 आहे. आज रोजी 630 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 37242 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8620 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8007 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 499 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 114 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.