175 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 644 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 467 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 177 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 155 व रॅपिड टेस्टमधील 22 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 308 तर रॅपिड टेस्टमधील 159 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 467 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 7, पोलीस वसाहत 3, राजेश प्लॉट 1, यशोधरा नगर 1, जुने पोस्ट ऑफिस जवळ 1, शिवाजी वेस 1, गोपाळ नगर 2, वानेरे ले आऊट 1, सिध्दी विनायक नगर 4, केला नगर 3, पोलीस लाईन 1, सुटाला 1, बालाजी प्लॉट 2, कृष्णा नगर 2, वामन नगर 4, वाडी 1, खती ले आऊट 1,कॉटन मार्केट रोड 5, दे. राजा शहर : 25, दे. राजा तालुका : गारखेड 2, बुलडाणा शहर : 3, समर्थ नगर 1, गणेश नगर 1, शाम टॉकीज जवळ 1, बुलडाणा तालुका : नागझरी 1, धाड 1, मातला 1, करवंड 1, चिखली शहर : 1, गांधी नगर 1, राऊतवाडी 4,संभाजी नगर 1, चिखली तालुका : आमखेड 4, टाकरखेड 2, बान खेड 1, दे. घुबे 3, सोनेवडी 1, सावरगाव डुकरे 1, शेलुद 1, मलकापूर शहर : 4, उपजिल्हा रुग्णालय 3, यशवंत नगर 1, मलकापूर तालुका : दाताळा 3, घिर्णी 1, मेहकर शहर : 3, मेहकर तालुका : डोनगाव 1, लोणार तालुका : रायगाव 1, बिबी 1, शिवणी पिसा 1, चिंचोली 1, नांदुरा शहर :2, विठ्ठ ल मंदिराजवळ 2, नांदुरा तालुका: निमगाव 3, वडनेर 1, तारखेड 1, जळगांव जामोद शहर : 1, जळगाव जामोद तालुका: खेर्डा 8, सिं. राजा तालुका : जंभोरा 1, साखर खर्डा 1, हिवरा गडलिंग 2, राहेरी 9, बरलींगा 1, मोताळा तालुका : बोराखेडी 2, धामणगाव 1, लोणार शहर :1, शेगाव तालुका : जलंब 1, माटरगाव 5, शेगाव शहर : व्यंकटेश नगर 1, जगदंबा चौक 1, फुले नगर 2, लखपती गल्ली 2, गौलखेड रोड 3, राजेश्वर मंदिर जवळ 1, खामगाव तालुका: जळका तेली 1, पिंपळगाव राजा 2, वर्णा 1, शेलोडी 1, सिंदखेड राजा शहर:1, मुळ पत्ता गौरक्षण रोड अकोला 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 177 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान शेगाव येथील 70 वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 175 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे. राजा तालुका : मेंडगाव 1, सरंबा 1, शेगांव शहर : जिजामाता नगर 15, लखपती गल्ली 1, व्यंकटेश नगर 1, दसरा नगर 2, ओम नगर 1, नागझरी रोड 2, प्रकटस्थळ 1, शिवाजी नगर 1, नांदुरा शहर : नगळकर ले आऊट 5, कोठारी स्कूल 1, खामगांव शहर : केशव नगर 1, पोलीस वसाहत 2, तलाव रोड 2, बालाजी प्लॉट 1, सुटाळपुरा 1, चिखली शहर : 10, खडकपुरा 1, चिखली तालुका : शेळुद 1, सि. राजा तालुका : मलकापूर पांग्रा 1, दरेगाव 4, तांदुळवाडी 2, आगेफळ 1, मोहाडी सवडत 4, बुलडाणा शहर : 18, द्वारका नगर 3, तानाजी नगर 1, विष्णु वाडी 3, बुलडाणा तालुका : वरवांड 1, नांदुरा तालुका : जीगाव 1, नायगाव 4, धानोरा 1, मेहकर शहर: 3, खामगाव तालुका: लखन वाडा 12, शेगाव तालुका : माटर गाव 1, मेहकर तालुका : जनेफळ 8, डोन गाव 17, जामगाव 3, जळगाव जामोद शहर : 7, जळगाव जामोद तालुका : वाडी खुर्द 3, दे. राजा शहर : 23, मलकापूर तालुका: शिरढोण 1, लोणवडी 1, मूळ पत्ता रिसोड जि. वाशिम 1.
तसेच आजपर्यंत 22771 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 3535 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 3535 आहे.
आज रोजी 1468 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 22771 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 4774 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 3535 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1176 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 63 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.