81 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 537 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 434 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 103 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 86 व रॅपिड टेस्टमधील 17 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 297 तर रॅपिड टेस्टमधील 137 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 434 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 30, खामगांव तालुका : अटाळी 3, शिर्ला नेमाने 1, नांदुरा तालुका : निमगांव 1, जळगांव जामोद शहर : 11, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : खेडी 4, लोणार तालुका : सावरगांव मुंढे 1, मांडवा 2, किन्ही 2, चिखली शहर: 5, चिखली तालुका : मेरा खु 2, रायपूर 1, अमोना 1, बुलडाणा शहर : 14, मलकापूर तालुका : वाघोळा 2, झोडगा 1, वडजी 1, मलकापूर शहर : 3, संग्रामपूर शहर : 1, शेगांव तालुका : झाडेगांव 1, कन्हारखेड 1, आडसूळ 3, शेगांव शहर : 8, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, मोहाडी 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 103 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान जुना जालना रोड, दे. राजा येथील 76 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 81 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 18, बुलडाणा तालुका : सागवण 1, खुपगांव 1, मेाहखेड 1, मासरूळ 1,दुधा 1, चांडोळ 1, डोमरूळ 1, मोताळा तालुका : आव्हा 1, टाकळी 1, टाकरखेड 1, माकोडी 1, नांदुरा तालुका : निमगांव 1, वडनेर 1, नांदुरा शहर : 10, दे. राजा शहर : 2, दे. राजा तालुका : गारगुंडी 4, दे. मही 1, सावरगांव जहागीर 1, लोणार तालुका : जांभूळ 1, लोणार शहर : 1, मलकापूर शहर : 2, मलकापूर तालुका : कुंड 1, खामगांव शहर : 2, चिखली तालुका : खंडाळा 1, शिरपूर 1, दुधलगांव 2, चिखली शहर : 3, मेहकर तालुका : सावत्रा 2, हिवरा गार्डी 4, जळगांव जामोद तालुका : वडशिंगी 7, पळशी घाट 1, मडाखेड 1, जळगांव जामोद शहर : 3.
तसेच आजपर्यंत 26419 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 4726 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4726 आहे.
आज रोजी 1579 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 26419 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 5951 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4726 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1150 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 75 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.