69 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 489 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 433 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 56 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 52 व रॅपिड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 331 तर रॅपिड टेस्टमधील 102 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 433 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे – बुलडाणा तालुका: चांडोळ 1, बुलडाणा शहर :4, दे. राजा शहर :1, दे राजा तालुका: सावखेड नागरे 2, दे मही 2, पळसखेड चक्का 1, मोताळा शहर :1, खामगाव तालुका : कारेगाव 1, चिंचपुर 1, खामगाव शहर : 10, सिंदखेड राजा तालुका : शिंदी 1, आठोडवडी 1, लोणार तालुका : पिंपळनेर 1, सरस्वती 1, गुंजखेड 2, लोणार शहर: 1, नांदुरा शहर : 4, नांदुरा तालुका : येरळी 1, चिखली शहर: 12, चिखली तालुका : शेळगाव आटोळ 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : उकळी 1, शेगाव शहर 1, शेगाव तालुका: जलंब 1, येथील संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 56 रूग्ण आढळले आहे. तसेच उपचारादरम्यान हरणी ता. चिखली येथील 65 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 69 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे – बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 15, मोताळा : 2, चिखली: 4, नांदुरा: 11, सिंदखेड राजा: 10, लोणार : 10, दे. राजा : 17.
तसेच आजपर्यंत 34021 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7309 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7309 आहे.
आज रोजी 438 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 34021 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8025 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7309 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 610 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 106 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.
next post