January 1, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 414 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 121 पॉझिटिव्ह

42 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा :
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 535 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 414 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 121 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 117 व रॅपिड टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 203 तर रॅपिड टेस्टमधील 211 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 414 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : 7, शेगांव तालुका : गौलखेड 1, कायगांव 1,कठोरा 1, दहीगांव 1, बुलडाणा शहर : 4, बुलडाणा तालुका : साखळी बु 1, नांद्राकोळी 1,वालसावंगी 1, चौथा 1, धाड 1, चिखली शहर : 6, चिखली तालुका : हिवरा गडलिंग 1, हातणी 2, दे. राजा शहर : 14, दे. राजा तालुका : दे. मही 1, नागणगांव 1, पोखरी 1, पाडळी 1. मेहकर तालुका : हिवरा आश्रम 2, खंडाळा 1, उकळी 1, बाभुळखेड 2, लव्हाळा 1, आरेगांव 1, मेहकर शहर : 11, सिं. राजा तालुका : दुसरबीड 1, निमगांव वायाळ 7, शेलगांव राऊत 1, साखरखेर्डा 4, सिं. राजा शहर : 1, मलकापूर शहर : 8, मलकापूर तालुका : उमाळी 1, संग्रामपूर तालुका : एकलारा बानोदा 1, मोताळा तालुका : तळणी 2, बोराखेडी 2, लोणार शहर : 2, लोणार तालुका : सुलतानपूर 1, किन्ही 1, पिंपळखुटा 2, जळगांव जामोद शहर : 4, खामगांव शहर : 6, खामगांव तालुका : टेंभूर्णा 4, नांदुरा तालुका : पिंपळखुटा धांडे 2, घोटा 1, पोटळी 1, मूळ पत्ता विल्हे ता. चोपडा जि. जळगांव 1, काजेगांव ता. बाळापूर जि. अकोला 1, भोकरदन जि. जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 121 रूग्ण आढळले आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : लोणार : 12, मलकापूर : 2, नांदुरा : 2, शेगांव : 1, दे. राजा : 1, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 19, मोताळा : 1, चिखली : 4. तसेच आजपर्यंत 36007 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7865 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7865 आहे. आज रोजी 433 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 36007 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8424 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7865 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 446 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 113 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

शेतकऱ्यांचे कांदा भाववाढी साठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 439 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 88 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

पशुवैद्यकीय दवाखाना बनला दारुड्यांचा अड्डा

nirbhid swarajya
error: Content is protected !!