April 19, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 410 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 36 पॉझिटिव्ह

12 रूग्णांची कोरोनावर मात


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटदद्ववारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 446 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 410 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 36 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 10 व रॅपिड टेस्टमधील 26 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 91 तर रॅपिड टेस्टमधील 319 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 410 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह अहवालामध्ये नांदुरा येथील 58 वर्षीय पुरूष,45, 74 व 75 वर्षीय पुरुष, 18 व 20 वर्षीय तरुणी, 45 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, 9 वर्षीय मुलगी, मलकापूर येथील 48 वर्षीय महिला, 45, 37 व 38 वर्षीय पुरूष, 12 वर्षीय मुलगा, मिर्झा नगर बुलडाणा येथील 25 वर्षीय पुरूष, सुरभी कॉलनी शेगांव येथील 58 वर्षीय महिला, 72 वर्षीय पुरुष, जम जम नगर शेगाव येथील 17 व 30 वर्षीय महिला, सिंदखेड राजा येथील 65 वर्षीय महिला, जुना जालना रोड दे. राजा येथील 40 वर्षीय महिला, चिखली येथील 65 वर्षीय महिला आणि पुरुष संशयितांच्या अहवालाचा समावेश आहे. तसेच घाटपुरी खामगांव येथील 21 व 48 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, जलालपुरा खामगाव येथील 17 वर्षीय तरुणी, 10 वर्षीय मुलगी, 42 वर्षीय पुरुष, पूरवार गल्ली खामगाव येथील 55 वर्षीय पुरुष, गांधी चौक खामगाव येथील 32 वर्षीय पुरुष, नॅशनल हायस्कूल जवळ खामगाव येथील 38 वर्षीय पुरूष, शिवाजीनगर खामगाव येथील 20 वर्षीय तरुण, शेगांव रोड खामगांव येथील 30 वर्षीय महिला, खामगांव येथील 25 वर्षीय पुरूष व 50 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 36 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 12 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये पारपेठ मलकापूर येथील 28 वर्षीय महिला, मेरा ता. चिखली येथील 35 वर्षीय महिला, चिखली येथील 19 वर्षीय मुलगा, कदमपुर ता. खामगाव येथील 52 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय महिला, दाल फैल खामगाव येथील 23 वर्षीय पुरूष, 43 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरुणी, 13 वर्षीय मुलगी व 26 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 3970 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 224 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 224 आहे. आज रोजी 209 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 3970 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 413 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 224 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 149 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 15 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 53 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 06 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

उदयोन्मुख युवा नेतृत्व गणेशभाऊ ताठे…

nirbhid swarajya

शू्न्यातून विश्व निर्माण करणारे सतिषअप्पा दुडे

nirbhid swarajya
error: Content is protected !!